फलटणमधील डॉक्टर पुरंदरजवळ अपघातात ठार


फलटण : फलटण येथील प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. सत्यन हुकूमचंद दोभाढा (वय 43) यांच्या कारला निरा (ता. पुरंदर) येथे अपघात होऊन या अपघातात ते जागीच ठार झाले. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास डॉ. दोभाढा हे पुणे येथून लोणंदवरून फलटणकडे येत असताना समोरून येणारी कार व त्यांच्या कारचा जेऊर मांडकी (ता. पुरंदर) येथील रेल्वे गेटजवळ अपघात झाला. यामध्ये ते जागीच ठार झाले.

अतिशय कमी वयात डॉक्टर होऊन अनेक रुग्णांची त्यांनी सेवा केली. अशा हुशार व लोकोपयोगी कामे करणार्‍या युवा डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाल्याने फलटणसह ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.