महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत अमृताने माणची अस्मिता उंचावली ।


म्हसवड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत म्हसवड च्या अमृता विजय खाडे ( पुजारी ) हिने राज्यात मुलींमध्ये तृतीय क्रमांक मिळवत माणचा झेडा फडकावत पोलीस उपनिरीक्षक पदी आपली निवड नक्की करीत माणची अस्मिता उंचावण्याचे काम केले आहे. 

अमृता खाडे हिने मिळवलेले यश हे अतिशय खडतर प्रवास करुन मिळवलेले असल्याने तिच्या या यशाबद्दल संपुर्ण माण तालुक्याला तिचा अभिमान वाटत आहे, खरे तर माण तालुक्याला बुध्दीवंताची खाण म्हणुन राज्यात सर्वत्र ओळखले जाते आजवर या तालुक्याने राज्यासह देशाच्या प्रशासनालाही अधिकारी दिले आहेत, कला, क्रिडा, शैक्षणीक अशा कोणत्याही क्षेत्रात माण तालुक्यात अनेकांनी नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे, या तालुक्यातील काही गांव तर आता अधिकार्यांचे गांव म्हणुन ओळखली जावु लागली आहेत एवढे अधिकारी एका एका गावात तयार झाले आहेत.

नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतही पोलीस उपनिरीक्षक पदी माण तालुक्यातील सुमारे १२ विद्यार्थ्यांनी बाजी मारली असली तरी या परिक्षेत म्हसवड च्या अमृता ने मिळवलेले यश हे वाखण्याजोगे आहे तीने महिलांमध्ये राज्यामध्ये ३ रा क्रमांक संपादित केला आहे. खरे तर अस्मिताला हे यश पाहण्यासाठी ४ वर्ष वाट पहावी लागली आहे गतवेळी झालेल्या स्पर्धा परिक्षेत तीचे रँकिंग अवघ्या २ मार्काने हुरल्याने प्रशासनात अधिकारी होईन तर रँकिंगनेच होईन असा तीने ठाम निर्धारच केला होता त्यासाठी ती जवळपास ८ ते १२ तास अभ्यास करीत होती त्यासाठी तीला खरेतर आईची व बहिणींची मोठी साथ मिळाली आहे, वडीलांचे छत्र अचानक हरवल्याने कुटुंबाला सावरण्याचे कामही अस्मितालाच करावे लागले, वडील जोपर्यंत हयात होते तोपर्यंत ती दररोज आपल्या वडीलांसोबत त्यांच्या हॉटेल कम खानावळीत थांबुन वडिलांना मदत करावयाची तर रात्री खानावळीतील सर्व भांडी घासुन घरी रात्री उशीरा पर्यंत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करावयाची कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीला अधिकारी बनवायचेच हे वडीलांनी पाहिलेले स्वप्न आपण पुर्ण करावयाचेच यासाठी अमृतानेही आपली अस्मिता पणाला लावली अन त्यासाठी स्वत:ला यात झोकुन दिले त्यामुळे यशानेही तिच्या जिद्दीसमोर लोटांगण घालत तिला अधिकारी बनवले, तर अमृताने आपण अधिकारी बनावे हे आपल्या वडीलांनी पाहिलेले स्वप्न अखेर पुर्ण केल्याने तिच्यावर आता सर्वच क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोणतेही क्षेत्र महिलांसाठी कठीण नाही -

स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी प्रामाणीक प्रयत्न अभ्यासाचे नियोजन केल्यास यश हमखास मिळते महिलांना या क्षेत्रात अनेक चांगल्या प्रकारे संधी आहे याकडे महिलांनी लक्ष केंद्रीत करुन स्वत: ला सिद्ध करावे.
-अमता खाडे ( पुजारी )


वडीलांचे स्वप्न पुर्ण केल्याने आम्हाला अमृताचा अभिमान वाटतो -

आपल्या मुलीने शिकुन मोठे अधिकारी व्हावे असे नेहमी अमृताच्या वाडिलांना वाटायचे आज अमृताने मिळवलेले यश पाहण्यासाठी ते हयात नाहीत पण अमृताने अधिकारी बनुन आपल्या वडीलांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण केल्याने आम्हा कुटुंबियांना तीचा अभिमान वाटतो आहे.

श्रीमती मंगल विजय खाडे
( पुजारी ) अमृताची आई 


बहिणी प्रमाणेच मी सुध्दा अधिकारी बनेल -

आमच्या ताईने अधिकारी बनुन वडीलांचे स्वप्न पुर्ण केल्याने ती आमच्यासाठी एक आयडॉल ठरली आहे तीचाच आदर्श घेवुन आपणही तिच्या पाठोपाठ प्रशासनात अधिकारी बनु त्यासाठी माझेही प्रयत्न सुरु आहेत.

माधुरी खाडे
( पुजारी )

No comments

Powered by Blogger.