कराड : बळीराजा शेतकरी संघटनेचा रास्तारोको


कराड : मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) येथील ढेबेवाडी फाट्यावर कराड-ढेबेवाडी मार्गावर राज्य शासनाचा निषेध नोंदवत बळीराजा शेतकरी संघटनेकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाची उदासीन भूमिका लक्षात घेता आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंजाबराव पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला तसेच शेतकऱ्यांसह महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला आला.

No comments

Powered by Blogger.