कराड उत्तरमधून निवडणूक लढवणारच: धैर्यशील कदम


कराड : आगामी निवडणुकीत उत्तर कराड मतदार संघातून रिंगणात उतरणार असल्याचे संकेत काँग्रेस नेते धैर्यशील कदम यांनी दिले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सुमारे ५८ हजारांच्या घरात मते मिळवली. आता तर नऊ जिल्हा परिषद सदस्यांपैकी पाच जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस विचारांचे आहेत. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून तो काँग्रेसला सोडण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते धैर्यशील कदम यांनी केली. त्याचवेळी आपली मागणी मान्य न झाल्यास आपण निवडणूक लढवेन, असे कदम यांनी स्पष्ट केले. 

कराडमध्ये कार्यकर्तांच्या बैठकीत धैर्यशील कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना हणबरवाडी - धनगरवाडी योजना गेली तीस वर्षे रखडली आहे. किवळसारख्या गावाला पाणीही देऊ शकत नाहीत. मतदारसंघातील १८७ गावांपैकी ६५ गावात आपल्या विचारांचे लोक सत्तेवर आहेत. त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी होऊन आपली मागणी मान्य न झाल्यास आपण शांत बसणार नाही. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण कोणत्याही स्थितीत कराड उत्तरमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करत आपण याबाबतीत नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचेच ऐकणार असल्याचेच सांगत धैर्यशील कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

No comments

Powered by Blogger.