सातारा पालिकेकडून दिव्यांग व्यक्‍तींना अर्थसहाय्य : खा. उदयनराजे


सातारा : समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या दिव्यांग व्यक्‍तींना उपजीविकेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी सातारा पालिकेने अंदाजपत्रकात 15 लाखांची तरतूद केली आहे. दिव्यांग व्यक्‍तींनी शासकीय योजनांबरोबरच नगरपालिका अर्थसहाय्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात दिव्यांग व्यक्‍तींना आर्थिक सहाय्याचा धनादेश वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, गटनेत्या स्मिता घोडके, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, लेखापाल विवेक जाधव, भांडर विभागप्रमुख देवीदास चव्हाण प्रमुख उपस्थित होते. खा. उदयनराजे म्हणाले, सातारा पालिकेने दिव्यांग व्यक्‍तींच्या उपजिविकेसाठी स्वनिधीतून तरतूद केली आहे.

दिव्यांग प्रत्येक घटकास आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन संस्थांना संगणक संच तसेच तेलाचा घाणा दिला आहे. 93 व्यक्‍तींना 15 हजारांची व्यक्‍तिगत मदत करण्यात आली. नगरपालिकेने दिव्यांगांप्रती आपले कर्तव्य बजावले आहे. दिव्यांग व्यक्‍तींच्या मागणीप्रमाणे उपजिविकेच्या वस्तु खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. त्याचा योग्य वापर करावा, असेही खा. उदयनराजे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.