सातारा : शॉक लागून शेतकरी ठार


म्हसवड : वडजल येथील शेतकऱ्याचा विजेच्या तारेला धक्का लागून मृत्यू झाला. आबाजी काटकर (वय 43) यांचे घाडगे नावाच्या शिवारात कांद्याच्या पिकाला पाणी पाजत असताना लोंबकळणाऱ्या केबलचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज (९ जून) घडली.याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी वडजल ता.माण येथील शेतकरी आबाजी जोती काटकर हे सकाळी 11च्या सुमारास घाडगे नावाच्या शिवारात कांद्याचे बी पेरलेल्या वावराला पाणी पाजत होते. काही वाफ्यांना पाणी पाजले असता विहिरीवरील इलेक्ट्रीक विद्यूत मोटरची केबल वावरात जमिनी लगत लोंबकळत होती. ती केबल काठीच्या सहाय्याने जमिनी पासून उंच करून उर्वरित वाफ्यांनी पाणी देणे सोप होईल म्हणून आबाजी प्रयत्न करत होते.

याच दरमान्य त्यांचा मुलगा अथर्व आणि तर त्यांची पत्नी मनिषा जेवण घेऊन रानात येत होत्या. आबाजी यांना हाताने केबल बाजूला करत असताना शॉक लागला व ते खाली पडले.हा प्रसंग त्यांचा 11वर्षाचा मुलगा पहात होता. वडिलांना शॉकचा धक्का बसलाय हे लक्षात येताच तो तिथून लांब टेकडावर जाऊन थांबला व काही वेळातच इतर वावरात मशागत करत असेलेल्या शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी मनिषा ही रानात आल्या.त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी गावातील सर्व ग्रामस्थांनी धाव घेतली.

No comments

Powered by Blogger.