Your Own Digital Platform

राजुरी येथे अपघातात एक ठार तर दोन जखमी


राजुरी :राजुरी ता. फलटण येथे फलटण - पंढरपूर महामार्ग राजुरी चौफुला नजिक हाॅटेल दिप गार्डन समोर दुचाकी व चारचाकी मारुती सेलेरो यांच्या मध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात शिवराज राजाराम चौधरी वय 18 एकशिव ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथील हा युवक जागीच ठार झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

बरड दुरक्षेत्रातील अधिकार्‍यांकडून व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी एकशिव ता. माळशिरस येथील चौधरी कुटुंब गिरवी ता. फलटण येथे एका नातेवाईकाच्या मयताच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. यामध्ये एका मोटार सायकल वरती शिवराज राजाराम चौधरी, मनिषा राजाराम चौधरी व साईराज रविंद्र रणवरे तर दुसर्‍या मोटार सायकल वरती राजाराम महादेव चौधरी व वडील महादेव बापू चौधरी हे होते. राजुरी येथील दिप गार्डन समोर फलटण कडून पंढरपूर च्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक MH 12 NP - 0138 एका ट्रक ला ओव्हरटेक करत असताना या कारने समोरून येणाऱ्या व फलटण च्या दिशेने निघाले दुचाकी क्रमांक MH- 42 J - 8677 या दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये वाहन चालक शिवराज चौधरी जागीच ठार झाला. तर त्याची आई मनिषा चौधरी व मामाचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात फार भीषण होता. पहाणार्‍या लोकांचे र्‍हदय पिळवटून टाकणारा होता. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताच्या ठिकाणी राजुरी व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदरच्या अपघाता बद्दल पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. सदर चार चाकी वाहन चालक किसन गिरजु गोपाळे रा. सुतारवाडी पाषाण जि. पुणे यांच्या विरोधात राजाराम महादेव चौधरी यांनी तक्रार दिली आहे. सदर अपघाताचा तपास बरड दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ करत आहेत.