Your Own Digital Platform

कराड : सुमतीनाथ जैन मंदिराचा शताब्दी महोत्सव


मसूर : मसूर (जि. सातारा) येथील श्री सुमतीनाथ जैन मंदिराचा ऐतिहासिक शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. या मंदिरास 100 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर 100 दिवसाचे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

गेल्या 8 दिवसापासून प्रतिष्ठा महोत्सव सुरू असून संगीत संध्या व आचार्य भव्यदर्शन महाराज यांच्या प्रवचनाचा हजारो लोक लाभ घेत आहेत. मसूरचे जैन बांधव एकोप्याने हा उत्सव साजरा करत आहेत. मसूरचे सूपूत्र आचार्य श्रीमद मित्रानंद सुरीश्वर महाराजा साहेब हे जैन साधू संप्रदायाच्या सर्वोच्च समकक्ष दर्जा झालेले होते. आत्ताचे गछाधिपती पुण्यपाल सुरीश्वर महाराजसाहेब हे मित्रानंद महाराजसाहेबांचे शिष्य आहेत हे मसूरचे वैशिष्ठ्य आहे.