Your Own Digital Platform

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांची वाळु तस्करांवर धडक कारवाई


म्हसवड :गेल्या काही वर्षा पासुन माण तालुक्यात वाळु तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असुन याबाबत जनतेमधुन महसुल विभागा बद्दल नाराजी व्यक्त केली जात होती मात्र वाळु तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी कर्तव्य निष्ठ प्रांताधिकारी म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब कांबळे यांनी स्वतः धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली असुन अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी एक भरारी पथक तैनात केले आहे , या पथकाने म्हसवड परिसरात अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यां ५ ट्रक , २ डंपर व १ ट्रॅक्टर अशी मिळून ८ वाहने पकडली असुन वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहेेेत महसुल विभागाच्या या धडक कारवाईने महसुल विभाग जोमात तर वाळु तस्कर कोमात गेल्याचे चित्र माण तालुक्यात दिसत आहे मात्र हे चित्र आणखी किती दिवस राहणार असा उदीग्न सवाल माणवासीयांतुन विचारला जात आहे.

माण तालुक्यात माणगंगेच्या वाळुला काळे सोने म्हणून ओळखले जाते या वाळुवर परजिल्ह्यातील वाळु तस्करांचा डोळा असल्याचे सिद्ध झाले असुन त्यांच्याकडुन अनेक वेळा मोठे हल्ले झाले आहेत , सध्या म्हसवड परिसरात वाळुमिश्रीत चे उत्खनन करण्यासाठी परवाने दिली असुन सायंकाळी ६ नंतर उत्खनन करण्यासाठी परवानगी नसतानाही उत्खनन करत असल्याच्या ,पावतीपेक्षा जाता वाळु वाहतुक व माणगंगेत अवैध वाळु उपसा केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या याची गंभीर दखल घेऊन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी एक भरारी पथक तयार करून ते स्वतः रात्री कारवाई करत आहेत.


म्हसवड परिसरात बुधवारी रात्री ९ वाजता पावती पेक्षा जादा वाळु व रात्री परवानगी नसतानाही वाहतुक करताना दोन ट्रक मनकर्णवाडी फाटा येथे पकडण्यात आले , शनिवारी रात्री म्हसवड येथे दोन डंपर वर विना पावतीची वाळु वाहतुक करताना कारवाई करण्यात आली , रविवारी रात्री ८ च्या सुमारास वरकुटे - शेनवडी रस्त्यावर तिन ट्रक मधून वाळु वाहतुक करताना परवानगी नसतानाही रात्री वाहतुक करणे , मॅजिक पेनचा वापर करून पावत्यांचा पुर्नवापर केल्याने कारवाई करण्यात आली तर त्याच मध्य रात्री ३ वाजता वाकी येथे अवैध वाळु वाहतुक करताना एका ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली आहे अशा एकुण ८ वाहनांवरती या पथकाने कारवाई केली आहे.

या भरारी पथकाने अनेक ठिकाणी कारवाई केल्याने व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कुणाचा हि मुलाहिजा न करता धडाकेबाज कारवाई करण्याचा सपाटा लावण्याने वाळु तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असुन या कारवाईच जनतेमधुन स्वागत करण्यात येत आहे , या कारवाई पथकामध्ये तलाठी गणेश बोबडे , संतोष ढोले , महेश शिंदे , तुकाराम नरळे ,दादा नरळे , लक्ष्मण पाटील हे कर्मचारी सहभागी होते.


वाळु तस्करांना चांगलीच धास्ती !

या पथकाच्या धास्तीने वाळुमिश्रीतच्या परवाना ठिकाणी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाळु उपसा करण्यास परवानगी असताना रात्री उशीरा सुरू असलेला उपसा बंद झाला असुन हे पथक माण-खटाव या तालुक्यासाठी असुन खटाव मध्ये विखळे येथे एका ट्रकवर कारवाई केली आहे तसेच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या धडाकेबाज कारवाईने माण-खटाव मधील वाळु तस्करांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.


माण - खटाव मधील अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी एक भरारी पथक तयार केले असुन या पथकाव्दारे अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे
- दादासाहेब कांबळे , प्रांताधिकारी