Your Own Digital Platform

शॉकने कुटूंबातील तिघांचा मृत्यू


वेणेगाव :  वर्णे, ता. सातारा येथे शॉक लागून एकाच कुटूंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून मृतांमध्ये पती-पत्नी व मुलाचा समावेश आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

सुरेश पांडूरंग काळंगे (वय 48), पत्नी सौ. संगीता सुरेश काळंगे (वय 40) व मुलगा सर्वेश सुरेश काळंगे (वय 16) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, सुरेश काळंगे हे पत्नी व मुलासमवेत वर्णेतील डोंगर शिवारातील पट्ट्यात शेताकडे गेले होते. सकाळी 8.30 च्या सुमारास रानात गेलेले हे कुटूंबिय सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने सुरेश यांचा मावसभाऊ श्रीमंत काळंगे शेतात त्यांना पाहण्यासाठी गेले. यावेळी ही घटना निदर्शनास आली. तिघांचेही मृतदेह त्यांना बांधावर आढळले.

घटनेबाबत मात्र तर्क वितर्क लढवले जात आहेत. डुकरांपासून संरक्षण होण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून मृत्यू झाल्याचे काहींचे म्हणणे असून काही जण मात्र त्याबाबत साशंकता व्यक्‍त करत आहेत. विहिरीवरील मोटर सुरू करत असताना सुरेश यांना शॉक बसला. जवळच असलेले पत्नी संगीता व मुलगा सर्वेश त्यांच्या मदतीला धावले. मात्र, त्यांचाही शॉक बसून जागीच मृत्यू झाल्याचीही चर्चा गावात सुरू होती.

दरम्यान, तिघांच्या मृत्यूचे वृत्त गावात पसरताच सर्वत्र गलबला झाला. सुरेश यांचे आई व वडील वृध्द असून ही घटना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्‍का बसला. सुरेश यांना सुजाता सुरेश काळंगे ही 21 वर्षाची मुलगी असून ती पु णे येथे इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा बोरगाव पोलिस ठाण्यात सुरू होती. माथेफिरू मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून