आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

शाहूपुरीकरांची पाणी टंचाईतून कायमची सुटका : खा. उदयनराजे भोसले


कण्हेर : कण्हेरची 24×7 पाणीपुरवठा योजना लवकरच परिपूर्ण होत असल्याने शाहूपुरीवासियांना 24 तास पाणी उपलब्ध होऊन कायमची पाणी टंचाईतून सुटका होणार आहे, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

शाहूपुरी येथील तामजाईनगरमधील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन शुभारंभ व सभामंडपाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्या सौ. अनिता चोरगे, पं.स. सदस्य संजय पाटील, पं.स. सदस्या सौ. वसुंधरा ढाणे, तुषार पाटील, ज्ञानेश्‍वर फरांदे, शिरीष चिटणीस, सुरेश साधले, युवा नेते संग्राम बर्गे, पो. निरीक्षक किशोर धुमाळ, सरपंच सौ. अमृता प्रभाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, शहरासह शाहूपुरीचा सर्वांगीण विकास होणे हा माझा मानस आहे. श्रेयासाठी भांडण्यापेक्षा कामे करण्याला मी महत्व देतो. सकारात्मक इर्षा उराशी बाळगून मी विकासकामे करत असतो. आवश्यक त्यावेळी आपल्या अडचणी सोडविण्यास मी सदैव प्रयत्नशील आहे. माजी उपसभापती संजय पाटील म्हणाले, खा. उदयनराजेंच्या सहकार्य व प्रयत्नातून कण्हेर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून येथील पोलीस ठाणे, डांबरीकरण रस्ते, कचर्‍यासाठी डेपो ही विकासकामे महाराजांनी केली आहेत.
ज्येष्ठ नागरिक सुरेश साधले, तुषार पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच शंकर किर्दत, सुधाकर यादव, सौ. लिलाबाई शितोळे, सौ. धनश्री ग्रामोपाध्ये, अमित कुलकर्णी, राजेंद्र गिरीगोसावी, राहूल यादव, सिद्धार्थ निकाळजे, बाळासाहेब चोरगे, रमेश धुमाळ, गणेश आर्डे आदी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन संदिप बाबर, यांनी केले. प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. आभार भिसे गुरुजी यांनी मानले.