Your Own Digital Platform

भारतमाता ज्युनि.कॉलेज मायणीचे एच.एस.सी. परीक्षेत उत्तुंग यश


मायणी :  फेब्रुवारी २०१८मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारतमाता ज्युनियर कॉलेजने उत्तुंग यश मिळविले असून वाणिज्य शाखेचा विद्यार्थी संग्रामसिंह दादासाहेब कचरे याने ९१ टक्के गुण प्राप्त करुन विद्यालयातील प्रथम क्रमाकांच्या मानकऱ्याचा बहुमान पटकाविला .

या विद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम तीन क्रमांकाचे गुणवान विद्यार्थी पुढील प्रमाणे .
शास्त्र विभाग (९९टक्के )

प्रथम क्रमांक- घाडगे समाधान आकाराम (७९.८४ ),द्वितीय क्रमांक _पवार अमोल सुरेश (७८.७६ ),तृतीय क्रमांक _ औतडे आकाश ब्रह्मदेव (७८.४६ )  कला विभाग -(७७टक्के )

प्रथम कु. देशमुख ऋतुजा देविदास (८२.७६ ),द्वितीय क्रमांक _कु. यादव श्रद्धा प्रल्हाद ( ८०.७६ ),तृतीय क्रमांक =कु. देशमुख गौरी विश्वास व कु.पडळकर सारिका संजय (८० ) वाणिज्य विभाग _(१००टक्के )

प्रथम क्रमांक -कचरे संग्रामसिंह दादासो (९१.६९),द्वितीय क्रमांक -कु. पवार नेहा भीमराव (८८.१५),तृतीय क्रमांक _ कु. देशमुख पूनम बाळासो (८६.९२ )

कला शाखेत ८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केलेली विद्यार्थीनी कु. देशमुख गौरी विश्वास ही अंध विद्यार्थीनी असून उत्कृष्ट गायिका देखील आहे. त्यामुळे तिने मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, संस्थापक सचिव सुधाकर कुबेर,सर्व संचालक ,प्राचार्य प्रमोद इनामदार व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .