Your Own Digital Platform

उपळवे परिसरावर पावसाची बरसात


फलटण  : संपूर्ण उन्हाळा कडाक्याचा खूप उष्ण गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेच्या झळा खूप सोसावे लागत होत्या. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज असतानाच मान्सूनपूर्व पावसाने फलटण तालुक्यातील भागांवर काल शुक्रवार दिनांक 8 र्क्षीपश रोजी सायंकाळी 5 वाजता फार मोठ्या प्रमाणावर पावसाची बरसात करून फलटण तालुक्यासह ग्रामीण भागावर फार मोठे एक प्रकारे दिलासा देण्याचे काम या मान्सूनपूर्व पावसाने केले आहे. एक प्रकारे खरीप हंगाम अतिशय चांगल्याप्रकारे जाण्याची शक्यता या पावसामुळे निर्माण झालेली आहे. हा पाऊस सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत पद्धतीने चांगल्या प्रकारे पडल्यामुळे जमिनीची एक प्रकारे तहान भागवली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, मटकी, तुर,घेवडा, वाटाणा यासारखी खरीप हंगामातील पिके सुरुवात करतील अशी शक्यता या पावसाने निर्माण करून दिली आहे.

 विशेष म्हणजे या पावसामुळे संपूर्ण भागातील बळीराजा सुखावला आहे आणि खरीप हंगाम मशागतीस तो आता वापसा येताच सुरुवात करेल यात मात्र कुठलीही शंका राहिलेली नाही. हा पाऊस पाठीमागील आठ दिवसांच्या पावसापेक्षा खूप संथ गतीने शांततेत कुठल्या प्रकारच्या वाळवा वार्‍याचा वेग वगैरे न करता अतिशय शांततेत पडला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवीत व वित्त हानी झालेली नाही. हा पाऊस संपूर्ण गिरवी मंडल संपूर्ण वाटार मंडल आदर्की मंडल या ग्रामीण भागातील सर्व सर्कलवर पडल्याने त्याठिकाणची जनता आनंदी वातावरणामध्ये खरीप हंगाम सुरू करेल अशी शक्यता तयार झालेले आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील नालाबंडिंग छोटेमोठे तलाव यामध्ये पाणी साठवून पूर्ण होण्याच्या मार्गावर आणण्याइतपत झालेला आहे.