Your Own Digital Platform

मफतलाल पवार यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर


राजुरी  : राजुरी गावचे युवा नेते मा.मफतलाल पवार यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त ३८ जनांनी रक्तदान केले , आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने रक्तदान शिबीराचे आयोजन राजुरी चौफुला ग्रुपने केले होते .

यावेळी राजुरी सोसायटीचे चेअरमन मा.श्री . महादेव गावडे यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी रक्तदान केले . त्याचबरोबर गावचे उपसरपंच पै. भारत गावडे पाटील , भुविकास बँकेचे डी.एन गावडे , डाँ . मोहन कर्णे , राजेश पोळ आदिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले .

मफतलाल पवार यांच्या वाढदिनी विद्यमान सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर , माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर , फलटण दूध संघाचे चेअरमन धंनजय पवार , फलटण कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायकराव पाटील ,राष्ट्रवादी फलटण तालूका युवक अध्यक्ष जयकुमार इंगळे , गावचे माजी सरंपच बाळासाहेब सांगळे , विठ्ठल खुरंगे , आण्णासाहेब जाधव , राजाराम साळूंखे , कांतीलाल खुरंगे, पोपट हगारे , किसन इंगळे , सचिन पवार, विलास गावडे, योगीराज साळुंखे , हनुमान उत्सव समितीचे हेमंत बागाव ,सामाजिक कार्यकर्ते रमेश बागाव ,पत्रकार वैभव गावडे आदिंनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या .

रक्तदान शिबीर राजुरी चौफुला येथे १ जून रोजी मागील सात दिवसापुर्वी आहिल्यादेवी होळकर जयंती निमीत्त झाले होते . पुन्हा त्याच ठिकाणी केवळ सहा दिवसाच्या फरकाने रक्तदान शिबीर यशस्वीपणे होईल का नाही यांची आयोजकांना चिंता होती , मात्र पवार यांच्या वाढता जनसंपर्क वाढदिवसानिमित्त युवकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे ३८ जनांचे रक्तदान झाले . रक्तदानासाठी फलटण ब्लड बँक डाँ . बिपीन शहा यांची टिम होती , रक्तदानासाठी माऊली जाधव , काँगेस चे युवा नेते संतोष गावडे पाटील यांचे विशेष योगदान राहिले . अनिल पवार यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले .