सातारा : ट्रॅक्टर दरीत कोसळून जतचे दोघे ठार


तारळे : पाटण तालुक्यात तारळे विभागातील कोंजवडे-सवारवाडी या घाट रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारा ट्रॕक्टर दरीत कोसळला. या अपघातात चालकासह सांगली जिल्ह्यातील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. विलास जयगुंडा कराडे (वय २६) आणि इराप्पा दशरथ खरात (वय २५, दोघेही रा.चिकुंडी करेवाडी ता. जत .जि सांगली) अशी दोघा मृतांची नावे आहेत.

जत तालुक्यातून विलास खराडे हे आपल्या ताब्यातील ट्रॕक्टर घेऊन शेणखत आणण्यासाठी तारळे विभागात डोंगरावर असलेल्या सवारवाडी येथे चालले होते. रात्रीच्या वेळी भरधाव वेगात ट्रॕक्टर चालवत असताना शेकडो फूट दरीत ट्रॕक्टर कोसळला. ट्रॕक्टरचे चार तुकडे झाले असून रात्री तीन वाजता दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. यावेळी भूडकेवाडी, माळवाडी व कडवे बुद्रूकच्या युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

No comments

Powered by Blogger.