Your Own Digital Platform

विहीर खोदताना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यूमायणी : 
विहिरीचे खोदकाम करीत असताना अनफळे ता.खटाव येथील तुळशिराम श्रावणा शिंदे वय ५० यांच्या डोक्यात दगड पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ,तुळशीराम शिंदे हे दातेवाडी ता. खटाव येथील मूळ रहिवाशी असून ते सध्या अनफळे ता. खटाव येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते.कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मोलमजुरीचे काम करत होते आज शनिवार रोजी सकाळी ते व पत्नी दोघे मिळून भिकवडी ता.खानापूर जि.सांगली येथे विहिर खोदकाम करण्यासठी गेले होते. खोदकाम काम करत असतानाच विहिरीतीलच दहा पंधरा फुटावरून दगड त्यांच्या डोक्यात पडला असता त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची नोंद विटा पोलिस ठाण्यात झाली आहे.