तरडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात शंभर स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया


आरडगांव : तरडगांव ता. फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अठ्ठावीस टाक्याच्या नसबंदी शस्त्रक्रिया, तर बिनटाक्यांच्या बाहत्तर नसबंदी शस्त्रक्रीया करणेत आलेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल कदम यांनी सांगीतले. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेच्या वार्षिक ऊद्दीष्ठाच्या पन्नास टक्के काम हे मे २०१८ अखेर पूर्ण करुन एक ऊच्यांक प्रस्थापित केला असल्याचे डॉ. कदम यांनी सांगीतले.

नुकतीच प्राथमिक आरोग्य केंद्रास पुर्ण रंगरंगोटी केलेली असुन सर्व परीसराची स्वच्छता केली आहे, परीसरात वृक्षारोपण केलेले आहे, डॉ. अनिल कदम, डॉ. साबळे पी.एन हे देत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल परीसरातील लोकांचेकडून त्यांच्या कामकाजाबद्दल कौतुक केले जात आहे, रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक पेशंटची आदराने चौकशी करुन त्याचेवर ऊपचार करत असल्याने तरडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या विनम्र व तत्परदेत असलेल्या चांगल्या सेवेबद्दल जनमानसांमधुन चांगल्या प्रतिक्रिया ऊमटतना दिसून येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा यांच्या कामाचेही कौतुक केले जात आहे,

No comments

Powered by Blogger.