Your Own Digital Platform

विडणीमध्ये ब्रिलियंट क्लासेसचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न


अलगुडेवाडी : महात्मा फुले युवक संघटना विडणी यांच्या वतीने ब्रिलियंट क्लासेस विडणी याठिकाणी  गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ  साजरा करण्यात आला. यावेळी एकूण 100 ट्रॉफयांचे वितरण गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले तसेच त्यांच्या पालकांचेही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे मा.श्री. धीरज अभंगसाहेब कक्ष अधिकारी मंत्रालय, महात्मा फुले युवक संघटनेचे अध्यक्ष सचिन अभंग ,  राजेंद्र शिर्के , विशाल शिंदे, शंकर जठार , माजी सरपंच राजेंद्र पवार,  माधव अभंग, विठ्ठल नाळे इ. मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ब्रिलियंट क्लासेसच्या दत्तात्रय नाळे सर यांनी सूत्रसंचालन केले.

धीरज अभंग साहेब, जठार साहेब, विशाल शिंदे इ. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर श्री वैभव शेंडे सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.