चांगल्या कामाचे फळ निश्चित मिळते -वैभव खताळ


आरडगांव : आयुष्यभर प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ निश्चितपणे मिळते, आपण केलेल्या चांगल्या कामाची दखलही समाज निश्चितपणे घेतो, त्याची पोचपावतीही समाज निश्चितपणें देतो. मात्र ते मिळवणेसाठी कामात स्वतःला झोकुन दयावे लागते, आपले कामचं आपणाला तारते असे प्रतिपादन कापडगांवचे माजी सरपंच वैभव खताळ यांनी केले. ग्रामपंचायत कापडगांव ( ता. फलटण ) येथील पटांगणावर संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कालवा निरिक्षक अरुण घाडगे यांच्या सेवानिवृती सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. अरुण सोपान घाडगे यांनी आपल्या आठ वर्षाच्या कामाच्या कालावधीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेले आहे. स्वभाव अतिशय, शांत, संयमी,अंगी कोणताही गर्व , अहंकार नाही, सर्वसामान्य शेतकरी यांना आपल्या नोकरीच्या कालावधीत त्यांनी जेवढी मदत करता येईल तेवढी केली, शेतकरयांचा पाण्याविषयी तक्रारी जाणुन घेऊन त्यांना सर्वतोपरी न्याय देण्याचे काम केले, लहान मोठा भेदभाव त्यांनी कधीही पाळला नाही, सरंपच, हेमंत कचरे बोलताना म्हणाले, घाडगे साहेबांनी आपल्याकडे येण्याअगोदर अहमदनगर या ठीकाणी पाच वर्ष काम करुन आपल्या कामाचा ठसा ऊमठवला आहे पाटबंधारे शाखा लोणंद येथे बदली झालेपासून त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कालवा निरीक्षक म्हणून काम केले आहे.

संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था कापडगाव, तांबवे जलाशय उपसा, हिंगणगाव ल. पा. तलाव या ठिकाणचे काम त्यांनी उत्कृष्टरित्या केले आहे. आपल्या कामाच्या कालावधीमध्ये त्यांनी कोणालाही दुखावले नाही. संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था, व ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या वतीने, कालवा निरीक्षक अरूण घाडगे यांचा शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ, व ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार सर्वांच्यावतीने करण्यात आला. . सेवानिवृत्तीच्या सत्काराला उत्तर देताना अरुण घाडगे म्हणाले , मी अहमदनगर जिल्हयात नोकरी केली परंतु फलटण तालुक्यातील लोकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले ते मी कदापी विसरू शकणार नाही. मी सदैव त्यांचा ऋणी राहील. कार्यक्रमास सरपंच हेमंत कचरे, माजी सरपंच वैभव खताळ, पाणी वापर संस्थेचे चेअरमन विजय करे, माजी उपसरपंच दादा करे, सोसायटीचे माजी चेअरमन दशरथ खताळ ,बापुराव खताळ, मंजाबा खताळ, प्रवीण खताळ, दप्तर कारकून थोरात, शाखाधिकारी शिरडोणकर, खताळ मॅडम, धायगुडे मॅडम, साबळे मॅडम आदी मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.