सातार्‍यात पोक्सोप्रकरणी युवकाला १० वर्षे सक्‍तमजुरी


सातारा : इयत्ता पाचवीमध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधिश-5 पी.व्ही.घुले यांनी आरोपी अविनाश नवनाथ लकडे (वय 20, रा.पिंपरी ता.कोरेगाव) याला 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 वर्ष साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, दोन वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, अविनाश लकडे हा पिडीत मुलीचे आई-वडील कामाला गेल्यावर तो मुलीच्या घरी जात होता. अल्पवयीन मुलगी त्यावेळी घरी एकटीच असायची. अवघ्या पाचवीमध्ये शिकत असणार्‍या या मुलीचा तो लैंगिक शोषण करत होता. अविनाश लकडे याने गैरकृत्य केल्याने मुलगी घाबरली होती. तो वारंवार हा प्रकार करु लागल्याने मुलीने घडलेल्या घटनेबाबतची माहिती आईला दिली. आईने घटना ऐकताच तत्काळ पतीला त्याबाबत सांगितले. अखेर २७ जून २०१६ रोजी रहिमतपूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली.

पोलिसांनी घटना ऐकल्यानंतर अविनाश लकडे याच्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले. या प्रकरणाचा सपोनि व्ही.डी. ढगे व सपोनि श्रीगणेश कानुगडे यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार व बचाव पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी अविनाश लकडे याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. महेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार पी.के. कबुले, शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, सुनील सावंत नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.

No comments

Powered by Blogger.