पाटण आगाराचा दुसऱ्या दिवशीही संपात सहभाग


पाटण : वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी राज्यभर एसटी संघटनांनी अचानक पुकारलेल्या बेमुदत संपाला दुसऱ्या दिवशीही पाटण आगाराने १०० टक्के प्रतिसाद दिला.

त्यामुळे पाटण आगारातून एकही एसटी बस बाहेर पडली नाही.या संपामुळे काल पासुन प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्ग यातून सुटला आहे मात्र सुट्ट्या संपत आल्याने शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

दरम्यान या संपामुळे कालपासून पाटण आगाराचे सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या संपात पाटण आगारातील सर्व कामगार संघटना, इंटक संघटना सुद्धा सहभागी झाल्या आहेत. संपामुळे पाटण आगारात दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट जाणवत होता.

No comments

Powered by Blogger.