Your Own Digital Platform

क्रांतिवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड चा १०० % निकाल


म्हसवड : एच एस सी परीक्षा फेब्रुवारी २०१८ मध्ये पार पडलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला त्यामध्ये क्रांतिवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड येथील विज्ञान शाखेचा १००% निकाल लागला.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेमध्ये क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील क्रांतिवीर ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल १००% लागला व उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.या कॉलेज मधील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे साक्षी समीर ढोले ७७%,यादव प्रणाली प्रकाश ७३%,शेख आयुब गुलाब ७१% या तीन गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.तसेच क्रॉप सायन्स या विषयात २०० पैकी लांब सुशांत १९४,आयुब शेख १८८,प्रणाली यादव १८७ गुण मिळवून या विषयाची यशाची परंपरा कायम ठेवली.

सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर ,सचिव सौ.सुलोचना बाबर,प्राचार्य विठ्ठल लवटे व शिक्षक ,पालक या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.