Your Own Digital Platform

फलटण पुर्व भागात राजुरी परीसरात तासभर दमदार पावसाची हजेरी


राजुरी : फलटण पुर्व भागात गेली आठ दिवस भयंकर उकाड्यामुळे नागरीक त्रस्त होते . आज तासभर पडलेल्या पावसामुळे हवेत आल्हाददायी वातावरणासह गारवा वाटत आहे . तसेच शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून ऊन्हाळ्यामुळे तापलेल्या ऊस, भुईमुंग , गवार , भेंडी ,कडवळ या पिकांना पावसामुळे पोषक वातावरण झाले आहे . 

नुकत्याच परीसरात हळवी कांद्याच्या लागणी झाल्या असून पावसामुळे त्यास पोषक वातावरण झाले आहे . राजुरी सह कुरवली , मुंजवडी , आंदरुढ ,बरड , वाजेगाव ,जावली परीसरात पाऊस झाला आहे , पाऊस काळात महावितरण कडून नेहमीप्रमाणेच विज गायब झाली आहे .