....अन्यथा न्यू फलटण विरोधात तीव्र आंदोलन


स्थैर्य, फलटण : न्यु फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या साखर कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट न केल्याने या कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकर्‍यांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून आतापर्यंत निवेदने मोर्चे ऊपोषण चर्चा भेटीगाठी या  शांततामय मार्गाने आंदोलने केली आता शेतकर्‍यांची सहनशीलता संपलेली आहे काही विपरीत घडण्यापूर्वी शासनाने तसेच कारखाना प्रशासनाने या प्रश्‍नात लक्ष घालून शेतकर्‍यांची ऊस बिले द्यावीत. तसेच दि.12 रोजी आयोजित केलेल्या बैठकीत जर न्यू फलटण शुगर वर्क्सचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत तर कारखान्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ फुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर, सचिन खानविलकर, नितीन यादव  यांनी तहसिलदार विजय पाटील यांना दिला.

न्यु फलटण शुगला वर्क्स या साखर कारखान्याने सन, 2017/18 च्या गळीत हंगामात नोव्हेंबर 2017  पासून पैहीले पंधरा दिवस सोडून त्या नंतरचे ऊस बिल न मिळाल्याने शेतकर्‍यांनी दशरथ फुले यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार विजय पाटील  यांना भेटून निवेदन दिले तसेच यावेळी ऊस बिल मिळावे म्हणून चर्चा केली त्या वेळी शुक्रवार दि 12 जून रोजी कारखाना पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांना तहसिल कार्यालयात बोलावून घेऊन या प्रश्‍नांची सोडवून करण्यासाठी ऊस पेमेंट कधी मिळेल याबाबत शेतकर्‍यांची चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र या या बैठकीस कारखान्याचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित न राहिल्यास शेतकर्‍यांना आपले आंदोलन तीव्र करावे लागेल व वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही उपस्थित शेतकर्‍यांनी दिला. 

No comments

Powered by Blogger.