Your Own Digital Platform

दहावीचा निकाल ९३.४३ टक्के


सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल 93.43 टक्के लागला. जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी यावर्षीही आपले वर्चस्व कायम राखले. सातारा जिल्ह्याने कोल्हापूर विभागात यावर्षी द्वितीय क्रमांक पटकावला.दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातील 43 हजार 164 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 43 हजार 71 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 40 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल 93.43 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली.

जिल्ह्यातील 12 हजार 534 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून प्रथम श्रेणीत 14 हजार 238, द्वितीय श्रेणीत 10 हजार 801, तर 2 हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी जिल्ह्यात महाबळेश्‍वर तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला असून तालुक्यात 790 मुले व 531 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 760 मुले व 504 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 95.69 टक्के लागला.

जावली तालुक्यात 734 मुले व 661 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 701 मुले व 594 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 95.57 टक्के लागला. माण तालुक्यात 1 हजार 837 मुले व 1 हजार 484 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 733 मुले व 1 हजार 438 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 95.48 टक्के लागला. वाई तालुक्यात 1 हजार 512 मुले व 1 हजार 312 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 419 मुले व 1 हजार 269 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 95.18 टक्के लागला.

खटाव तालुक्यात 2 हजार 144 मुले व 1 हजार 745 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 999 मुले व 1 हजार 684 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 94.70 टक्के लागला. खंडाळा तालुक्यात 1 हजार 156 मुले व 997 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 73 मुले व 958 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 94.36 टक्के लागला. सातारा तालुक्यात 4 हजार 102 मुले व 3 हजार 337 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 3 हजार 741 मुले व 3 हजार 185 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 93.10 टक्के लागला.

कोरेगाव तालुक्यात 1 हजार 880 मुले व 1 हजार 574 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 626 मुले व 1 हजार 513 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 93.59 टक्के लागला. पाटण तालुक्यात 2 हजार 84 मुले व 1 हजार 856 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 904 मुले व 1 हजार 755 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 92.87 टक्के लागला.कराड तालुक्यात 4 हजार 593 मुले व 4 हजार 49 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 4 हजार 195 मुले व 3 हजार 854 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 93.14 टक्के लागला. फलटण तालुक्यात 2 हजार 670 मुले व 2 हजार 163 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 2 हजार 334 मुले व 2 हजार 2 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 89.72 टक्के लागला.

जिल्ह्यातील रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 38.31 टक्के लागला. 2 हजार 136 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 122 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 813 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहर व परिसरातील इंटरनेट कॅफे व एमएससीआयटी केंद्रावर विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती.

सातारा शहरातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे 381 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 378 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकाल 99.21 टक्के लागला. महाराजा सयाजीराव विद्यालयाचे 357 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 350 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 98.03 टक्के लागला. न्यू इंग्लिश स्कूलचे 417 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 96.64 टक्के लागला. कन्याशाळेचे 460 विद्यार्थींनी बसल्या होत्या त्यापैकी 418 विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या. निकाल 90.86 टक्के लागला. अनंत इंग्लिश स्कूलचे 393 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 328 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकाल 83.00 टक्के लागला.