Your Own Digital Platform

येणाऱ्या निवडणुकीत धनगर समाज आपली ताकत दाखवणार : आ.जयकुमार गोरे


म्हसवड  : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या खोट्या वल्गणा करुन राज्य व केंद्र सरकारने गतवेळी सत्ता ताब्यात घेतली मात्र गत ४ वर्षापासुन सरकारने हा प्रश्न लटकवत ठेवला या सरकारकारला या समाजाला आरक्षण द्यायचे नाही फक्त या समाजाची दिशाभुल करावयाची आहे मात्र आता हा समाज संघटीत झाला असुन आरक्षणाच्या मुद्दयावरुन एकत्र आलेला हा धनगर समाज येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकत दाखवुन देईल असे विचार माण - खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती निमित्त धनगर समाज आरक्षण यलगार मेळावा आयोजित केला होता त्यावेळी अध्यक्ष स्थानावरुन आ. गोरे बोलत होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विधान परिषद सदस्य आ.रामहारी रुपनवर, यशवंत सेना प्रमुख माधवराव गडदे,अखिल भारतीय धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, शरदराव कर्णवर राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अर्जुन काळे,दादासाहेब काळे,बाबासाहेब हुलगे,माजी नगराध्यक्ष विजय धट,सुरेश म्हेत्रे, नितीन दोशी, डॉ वसंत मासाळ, डॉ लक्ष्मण कोडलकर, सिध्दार्थ गुंडगे, नगरसेवक रणजीत येवगे, पोपट मासाळ, नारायण मासाळ, मारुती विरकर, बाळासाहेब पुकळे, स्नेहल काळे, डॉ .बाबासाहेब दोलताडे, विकास गोंजारी, जगन्नाथ लोखंडे, आकाश राजमाने, ब्रम्हानंद पुकळे, लुनेश विरकर, शिवाजी लोखंडे इ.मान्यवर उपस्थितहोते.
यावेळीपुढे बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले गळ्यात नोटाचे हार घालून हातात झेंडा घेऊन आरक्षण मिळत नाही ते कोठे मागितले पाहिजे हे कळले पाहिजे. ज्या लोकांनी मला घडवले मला वाढवले त्यात धनगर समाजाचा मोठा वाटा आहे.

पहिल्या पंधरा दिवसात आरक्षण देतो म्हणाले ते आता कुठे गेले. तालुक्यात निवडणुका आल्या की काही जण निवडणूकीपूरते समाजाचा खोटा कळवळा घेऊन येतात .जो येथील जनतेच्या सुख दुखात कायम बरोबर असणार्याच्या व आपल्यासाठी जो झटतोय ते ओळखून त्याची पाठराखण करणे गरजेचे आहे. अहिल्यादेवींच्या विचाराने पुढे जाऊयात. धनगर आरक्षण आंदोलनाचा फायदा कोणी घेतला या जनतेला माहित आहे.धनगरसमाजाने मला कायम ताकद दिली हा समाज माझ्यापाठिशी राहिला तर अजून पंधरा वषँ दुसर्या कुणाला या मतदारसंघात फाटी शिवून देणार नाही. सध्या अनेक गडी म्हणत्याती आमच्या दादामुळे उरमोडीचे पाणी तालुक्यात आले जे समाजासाठी झटतात लढतात त्यांची पाठराखण करा.असे आ.गोरे शेवटी म्हणाले.

यावेळी बोलताना आ. रामहारी रुपनवर म्हणाले धनगर समाजाने संघटीत होऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला सळोकीपळो करुन सोडू, ५४ जिल्ह्यात माझे कार्यक्षेत्र आहे. २०१४च्या विधानसभा निवडणूकीतील लाटेतही धनगर समाज आ.गोरेच्या पाठीशी येथील जनता उभी राहिली.त्यांनीही समाजाच्या पाठिशी उभे राहून समाजाचे प्रश्न सोडवले.काहीजण स्वताच्या स्वार्थासाठी आरक्षणाच्या मुद्यावर गोंधळ निर्माण करतात.यावेळी त्यांनी राजमाता अहिल्यादेवीचा इतिहास व कायाँची माहिती देत समाजातील काही चुकीच्या गोष्टींवर आपले परखड विचार मांडले.

यावेळी बोलताना माधवराव गडदे म्हणाले,अहिल्यादेवी जयंती राजकारणाचा आड्डा होऊ नये. राजकारणामुळे धनगर समाजाचे मूळ प्रश्न बाजूला पडले आहेत.अनेक प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणबाजूला ठेवले पाहिजे,बहुजनांसाठी व अखंड मानव जातीसाठी अहिल्यादेवींनी काम केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ,तालुक्यातील गावोगांवातुन आलेल्या गजी नृत्य पथकांनी गजीनत्य सादर केले.,त्यानंतर सायंकाळी अहिल्यादेवीच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक शहरातुन फटाक्यांच्या आताषबाजीत ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव मिरवणुकीत सामील झाले होते.

कार्यक्रमाची प्रस्तावणा डॉ वसंत मासाळ यांनी केली.यावेळी अर्जुन काळे , डॉ बाबासाहेब दोलताडे, प्रविण काकडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कायँक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.