Your Own Digital Platform

युवकांनी मोबाईल च्या आहारी न जाता मैदानी खेळ खेळावेत : भगवान बुरसे


राजुरी :आधुनिकतेच्या युगात तरुण युवकांनी मोबाईल वापराच्या आहारी न जाता मैदानावर खेळल्या जाणार्‍या खेळ प्रकारांना प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन ए. पी. आय. भगवान बुरसे यांनी केले. 

राजुरी ता. फलटण येथे एन. एस. क्रिकेट क्लब राजुरी यांच्या विद्यमाने भव्य हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिति

राष्ट्रवादी युवक संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन चव्हाण , राजुरी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण बागाव, जिद्दी युवा मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण , गव्हर्नमेन्ट कॅन्ट्रॅकटर विजय सांळुखे, मा. ग्रा.प. सदस्य विजय रणदिवे, युवा नेते गणेश पवार, आनंदराव साळवे, पै. बिपीन बागाव, मेजर राहुल बागाव, राष्ट्रवादी युवक शाखा अध्यक्ष प्रशांत रणदिवे, संतोष काशिद, कॅन्ट्रॅकटर सचिन माने, मातंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदयसिंह बागाव, अमोल लोंढे, गणेश बागाव, सामाजिक कार्यकर्ते रमेश बागाव, अक्षय गायकवाड, तेजस माळवे, वैभव मदने, राहुल भंडलकर, करण माळवे आदींसह मान्यवर मंडळी व खेळाडू उपस्थित होते. 

प्रथम क्रमांकाचे 7 हजार रुपये बक्षिस घातक क्रिकेट क्लब गिरवी ता. माळशिरस संघाने पटकावले. द्वितीय क्रमांकाचे 5 हजार रुपये एन. एस. क्रिकेट क्लब राजुरी संघाने पटकाविले. 

तृतीय क्रमांकाचे 3 हजार रुपये एस. के. कन्ट्रेक्शन क्रिकेट क्लब राजुरी यांनी पटकाविले. तर चतुर्थ क्रमांकाचे 2 हजार रुपये भोईराज क्रिकेट क्लब धर्मपुरी ता. माळशिरस यांनी पटकाविले. या सामन्यामध्ये सुमारे 30 ते 35 संघ सहभागी झाले होते. सामने पार पाडण्यासाठी अनेक मंडळींनी सहकार्य केले. सर्व विजेत्या संघाला अनिल चव्हाण यांच्या वतीने चषक देण्यात आले.