विखळे विद्यालयात योग दिन साजरा


मायणी :धकाधकीच्या जीवनात मानव प्राणी स्वास्थ्य कडे दुर्लक्ष करून सुखासीन होण्याचा अविरत प्रयत्न करीत असतो.. यातूनच मानव वेगवेगळ्या आजारांना बळी पडत असतो. मानव सुदृढ आणि सशक्त रहावा म्हणुन ” आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यात येतो.त्यानिमित्त विखळे ता.खटाव येथिल कमळेश्वर विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक पोपट मिंड यांचे अध्यक्षतेखाली योगासने व प्राणायाम चा कार्यक्रम घेण्यात आला.यात क्रिडा शिक्षक श्रीनिवास चव्हाण,सतिश पवार या शिक्षकांनी योगा, प्राणायाम, विविध शारीरिक व्यायाम कृती सह प्रात्यक्षिक करून दाखवले व योगाचे महत्व विशद केले. यात वर्ग ५ ते १० वी चे विद्यार्थी व विद्यालयातील सर्व शिक्षक बंधु, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.