Your Own Digital Platform

विध्यार्थ्यांच्या निकलामध्ये नक्की यश कुणाचं ?


म्हसवड :नुकत्याच लागलेल्या १० वी १२ वी च्या परिक्षेच्या निकालात सर्वत्र गुणांचा महापुर आलेला दिसुन आला असला तरी या परिक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी हे आमच्याच शाळेचे व आमच्याच क्लासचे असल्याचा दावा केला जावु लागला असुन यासाठी शाळेकडुन व क्लास कडुनही मोठी बँनरबाजी सुरु असल्याचे चित्र माण तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यात दिसत असले तरी यामध्ये शाळा अव्वल की खाजगी क्लास अव्वल असा प्रश्न नवा पेच पालकांसह विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
 
नवीन शैक्षणीक वर्ष सुरु होताच आमचीच शाळा कशी आदर्श व दर्जेदार असुन आम्ही विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात किती व कसे विविध उपक्रम राबवतो यामुळे विद्यार्थ्यांची कलात्मक व गुणात्मक गुणवत्ता कशी वाढते हे सांगण्याची जणु शाळांची एकप्रकारे स्पर्धाच सुरु होते,  अनेकदा अशा जाहीरातबाजीमुळे अनेक पालक व विद्यार्थी याकडे आकर्षित होतात काही वेळा त्यांची फसगतही होते तर अनेकदा आमच्या शाळेचे विद्यार्थी मोठे अधिकारी बनले आहेत हे सुद्धा पालकांसमोर मांडले जाते एकुणच काय तर त्या पालकाने आपला पाल्य आमच्या शाळेत पाठवावा हाच मुख्य हेतु असे असले तरी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाला बाह्य खाजगी क्लासची गरज असते का? हा आणखी एक नवा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे, अगोदरच भरमसाठ रक्कम भरुन आपल्या पाल्याला पालक शाळेत पाठवतात त्यात जर तो विद्यार्थी १० वी किंवा १२ वी ला असेल तर विद्यार्थ्यांपेक्षा पालकवर्गच अधिक काळजी करतात,  १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांनी दिवसभर शाळा करावयाची आणी नंतर घरी आल्यावर होमवर्क करायचा असाच काहीसा पुर्वी चा ट्रेंड असायचा सध्या मात्र यात बदल झाला असुन आता खाजगी क्लासचा नवा ट्रेंड निर्माण झालाय हा ट्रेंड सध्या सर्वांनाच हवा हवासा वाटत असल्याने खाजगी क्लास मध्येही प्रवेश घेण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत आमचाच क्लास कसा सर्वोत्तम आहे हे दाखवण्यासाठी खाजगी क्लास घेणाऱ्यांची मोठी स्पर्धा सुरु असुन या स्पर्धेतुनच मग मोठ मोठ्या जाहीराती केल्या जातात जेवढ्या मोठ्या पेपरला जाहीराती तेवढी मोठी फी हे एक समीकरणच खाजगी क्लासचे बनले आहे.

 अगोदरच भली मोठी रक्कम शाळेत भरुन पालकवर्ग बेजार झालेला असुनही तो आपल्या पाल्याचा भवितव्यासाठी व अधिक काळजीपोटी तो या खाजगी क्लासच्या जाहिरातींना भुलुन पालक वेळप्रसंगी कर्ज काढुन आपल्या पाल्याला खाजगी क्लास मध्ये पाठवतात मात्र प्रत्यक्षात जेव्हा त्या विद्यार्थ्याचा निकाल हाती येतो त्यावेळी तो आमच्याच क्लासचा आहे हे दाखवण्यासाठी तशी बँनरबाजी केली जाते तर शाळेकडुनही अशा प्रकारची बँनरबाजी केली जाते,  नुकत्याच लागलेल्या १० वी १२ वी च्या परिक्षेच्या निकालामुळे तर अशा प्रकारच्या बँनरबाजी ला सर्वत्र ऊत आलेला दिसत असला तरी विद्यार्थ्यांचे नक्की यश कोणामुळे हा प्रश्न मात्र सर्वसामान्य पालकवर्गाला पडु लागला आहे.
   
    शाळा जर दर्जेदार असतील तर विद्यार्थ्यांना खाजगी क्लासची गरज का वाटते ?
 
जर खाजगी क्लास चे विद्यार्थी १० वी १२ वी च्या परिक्षेत टॉपर ठरत असतील तर मग शाळेत त्याला नेमके काय शिकवले जाते ?

असे विविध प्रश्न सध्या पालकवर्गाला पडल्याचे दिसुन येत आहे.


यंदापासुन लागणार विद्यार्थ्यांचा कस

यंदाच्या नवीन शैक्षणीक वर्षापासुन १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे दिली जाणारी बोनस मार्क कमी करण्यात आली असल्याने या परिक्षेत आता पास होण्यासाठी विद्यार्थ्यांचा खरा कस लागणार आहे.