वृक्षांची जोपासना करणे काळाची गरज : गजानन चव्हाण


मायणी : वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील, असे प्रतिपादन खटाव तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन चव्हाण यांनी केले.मायणी पक्षी अभयारण्य येथे आयोजित केलेल्या पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी वनपरिमंडळ अधिकारी मोहन शिंदे,दादासाहेब लोखंडे, दादा जानकर मायणी फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव,तानाजी चव्हाण, सतीश डोंगरे,दत्ता कोळि,अमोल भिसे,गणेश पाटील,शैलेश भिसे,मोहन जाधव,दुर्योधन जाधव ,अंकुश पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे चव्हाण म्हणाले १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत खटाव तालुक्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षाची जोपासना करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.