सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व


कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत व्याघ्र प्रकल्पामध्ये लावलेल्या कॅमेर्‍यांमध्ये दोन विभागात पट्टेरी नर वाघाच्या हालचाली कैद झाला असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक व म. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.

याबाबत भाटे यांनी सांगितले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांच्या अभ्यासासाठी ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेर्‍यांमध्ये टिपलेल्या छायाचित्रांचा व वन्य प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास नुकताच केला. यावेळी व्याघ्र प्रकल्पातील दोन विभागांमध्ये 23 व 24 मे 2018 रोजी नर पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे दिसून आले आहे. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था यांच्यासोबत एका कार्यक्रमांतर्गत संपूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ग्रीड करून दर दोन किलोमीटर अंतरामध्ये कॅमेरे लावले होते. या भागात पायी व कॅमेर्‍यांनी अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासानुसार व्याघ्र प्रकल्पात सांबर व भेकर यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांचे केलेल्या चांगल्या संरक्षणामुळेच ही संख्या वाढल्याचेही रोहन भाटे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.