Your Own Digital Platform

मिरगावनजिक वाहतूक ठप्प; श्रीमंत रामराजे निंभोरेमार्गे फलटणला
फलटण : सातारा रोडवरील मिरगावनजिकच्या एका छोट्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे पुलाची कड खचली होती. त्याठिकाणी झालेल्या खड्डयात मालवाहू ट्रक अडकून पडल्याने फलटण - सातारा रोडवरील चारचाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यादरम्यान सातारहून फलटणकडे येताना खुद्द विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाही मिरगाव - फलटण प्रवास निंभोरे मार्गे करावा लागला.