गोखळी येथे विविध उपक्रमांनी अहिल्याबाई होळकर जयंती साजरी


गोखळी : अहिल्याबाई होळकरांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लोककल्याणकारी कार्य केले. त्यांच्या कार्याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा असे प्रतिपादन नम्रता पोंदकुले यांनी व्यक्त केले. अहिल्या प्रतिष्ठान गोखळी ता.फलटण येथील आयोजित अहिल्यादेवी जयंती निमित् व्याख्याते नम्रता पोंदकुले यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल विचार मांडले प्रारंभी कु.नम्रता पोंदकुले यांचे हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याजयंती सोहळ्यामध्ये मिरवणुक, डी.जे.ला फाटा देऊन रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, किर्तन, क्रिकेट सामने, व्याख्यान विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुञसंचालन कु. मोनाली मोकाशी यांनी केले.लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत वाहतूक निरीक्षक म्हणून निवड झालेल्या कु.हर्षदा खारतुडे, अक्षय खोमणे, महेश गावडे, अतुल गावडे यांचा तसेच समाज भूषण पुरस्कार मिळालेल्या बद्दल सौ.साधनाताई संभाजी गावडे, राजे मल्हारराव होळकर पुरस्कार मिळालेल्या बद्दल बजरंग खटके याचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी वाहतूक निरीक्षक संभाजीराव गावडे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.उषादेवी गावडे गुणवरेच्या माजी सरपंच साधनाताई गावडे, युवा नेते बापूराव गावडे सतिश सांगळे ,बापुराव सांगळे,ज्योतिराम गावडे,सोन्या भाऊ आटोळे, डाॅ. शिवाजी गावडे ,सरपंच अमित भैया गावडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, तानाजी बापु गावडे , माढा लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख पिंटू इवरे, भाजपचे युवा नेते पै.बजरंग नाना गावडे (सवई ),पै बजरंग खटके, माजी सरपंच नंदकुमार गावडे , किरण देवकाते,आशिश देवकाते ,योगेश गावडे पाटील ,आबासो .मदने, अनिरुद्ध गावडे साहेब व गोखळी खटकेवस्ती, पंचबिघा गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.