मुकबधीर विद्यालय ठाकुरकी या शाळेचा एस.एस.सी परिक्षेचा निकाल १००%


फलटण : महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधीर विधालय ठाकुरकी या शाळेचा एस.एस.सी. मार्च २०१८ परिक्षेचा निकाल १००% लागला आहे. विशेष म्हणजे हि सर्व मुले पूर्णता कानाने अधू असून यांना अजिबात ऐकताही येत नाही व बोलताही येत नाही अशा परिस्थितीत त्यांनी परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे या मुलांना नाॅरमल मुलांचाच अभ्यास असतो.

महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधीर विधालयाची यंदा हि पहिलीच बॅच दहावीला गेली होती. या पूर्वी या विधालयामध्ये सातवी पर्य॔तच शिक्षणाची सोय होती. विधार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता संस्थेने मोठ्या धाडसाने कोणतेही अनुदान नसताना संस्थेने या मुलांसाठी खास प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली होती.

संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची व कमिन्स इंडिया लिमिटेड या मेघा कंपनीच्या मॅनेजमेंटशी चर्चा झाली असून या मुकबधीर मुलांनी आय. टी. आय.मध्ये विशेष ट्रेनिंग घेतले तर या मुलांना येथेच नोकरीची संधी प्राप्त होणार असल्याचे मत मुकबधीर विधालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिप्ती देसाई यांनी सांगितले. सौ. हेमा गोडसे, सौ. वैशाली शिंदे, रेवती काकडे, उदय निकम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विधार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, सातारा जि.प.अध्यक्ष मा.ना. श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, नगर परिषद पाणीपुरवठा सभापती मा श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर,अतिरिक्त कमिशनर मा.श्री. हर्षल निकम, एक्साइज अतिरिक्त कमिशनर मा.श्री. सुनिल चव्हाण, एस ऐ आय ग्लोबल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. राजू भोईटे, शिक्षण सभापती सौ. प्रगतीताई जगन्नाध कापसे, स्वच्छता समितीच्या सभापती सौ. वौशालीताई अहिवळे, नगरसेवक अजय माळवे, नगरसेवक जगन्नाथ कुंभार, नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर, संस्थेचे अध्यक्ष श्री. विनोद हाके, आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक मा.श्री.दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले, यांनी अभिनंदन केले.

1 comment:

  1. खूपच प्रशंसनीय यश आहे.

    ReplyDelete

Powered by Blogger.