Your Own Digital Platform

फलटण : बेजबाबदारपणा नडला, दोन पोलिस निलंबित


सातारा : फलटण शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांवर कर्तव्यचुती, बेशिस्त व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई केली. किशोर हणमंत गिरी आणि नितीन दिलीप चतुरे अशी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांवरच झालेल्या या कारवाईने पोलिस दलात एकच गोंधळ उडाला.


याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस हवालदार किशोर गिरी हे फलटण बीटमध्ये तर नितीन चतुरे हे गुन्हे तपास पथकात कार्यरत होते. फलटण बीट व फलटण शहरात अवैध धंदे सुरु असल्याची तक्रार नागरिकांनी वेळोवेळी केल्या. शिवाय अरुण उर्फ गब्बर माणिक जाधव हा तडीपार असतानाही नागरिकांना दमदाटी करत असल्याचेही समोर आले आहे.

या सर्व बाबींचा तपास वेळेवर नसल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर आज, बुधवारी (दि.१३ जून) पोलिस अधीक्षक पाटील यांनी निलंबण्याची कारवाई केली. तर या कारवाईनंतर दोन्ही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश ही देण्यात आले. निलंबन कालावधीत या दोन्ही पोलिसांचे मुख्यालय ढेबेवाडी देण्यात आले आहे. दरम्यान, अशाप्रकारे बेशिस्त वागणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.