Your Own Digital Platform

उद्योजक महात्मा फुले यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा


फलटण : महात्मा फुले यांनी उद्योजक व पुण्याचे कमिशनर म्हणून केलेले क्रांतिकार्य आजही साक्ष देत आहे. महात्मा फुले यांनी उद्योग व्यवसायातून मिळवलेले उत्पन्न समाज प्रबोधनासाठी व परिवर्तयासाठी उपयोगात आणले.असे प्रतिपादन प्रा.डॉ. प्रभाकर पवार मुधोजी कॉलेज यांनी केले.

फलटण येथील माळजाई मंदिर हॉलमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३व्या जयंती , गुणगौरव समारंभ प्रसंगी प्रा.प्रभाकर पवार बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संपतराव जाधव बोलत होते.प्रमुख उपस्थिती सौ वैशाली चोरमले नगरसेविका व संपादक साप्ताहिक आस्था टाइम्स श्री नितिन बिचुकले , होते.मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सुजन फाऊंडेशन यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या महात्मा फुले विचार अभियान या सहभागी व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला.

सुजन फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध उद्योजक श्री तुकाराम कोकाटे यांना सामाजिक विधायक व चौधरवाडी ग्रामविकासातील शिक्षण क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल महात्मा फुले अवॉर्ड २०१८ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महात्मा फुले विचार अभियानातील सहभागाबद्दल भरती जगताप क्षितिज सामाजिक व शैक्षणिक संस्था , विशाल नाळे धन्वन्तरी संस्था, हनुमंत मोरे मोरेश्वर शिक्षण संस्था , सौ शुभांगी रासकर जीवनज्योत संस्था व सौ प्रीती भोजने प्रयाग संस्था यांना सन्मानित करण्यात आले.भावनेतून समाजहित व देशहित जोपासत कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील गुणवंत महिलांचा सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमा करिता महिला पोलिस नाईक सौ सविता आगम फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन,सरकारी वकील सौ आकांक्षा रणवरे ,सौ.मेघा गायकवाड तरडगाव ,आरोग्यसेविका सौ मोनाली खरात व मनीषा गुलदगड ,कुमारी समीक्षा सोनवलकर ,उल्का करचे, सौ राणी बिचुकले उपसरपंच भाडळे,सौ कीर्ती रुपनवर ,तलाठी दीपाली शिंदे,प्रियांका मदने,सारिका मदने,पल्लवी खुस्पे, संचित ढेकळे,पोलीस पाटील गौरी बनकर व सुजाता नाळे, सौ सुजाता कारंडे सौ जया ताई सांगळे श्री अरुण जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी फलटण ग्रामीण पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी श्री निलेश सोनवलकर व दीपक मदने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाकरिता विजयकुमार लोखंडे , प्रदीप नाळे, सुखदेव फुले,अनुलोम संस्थेचे समीर पवार , श्री मोहन खरात ,बबनराव लोखंडे यांचे सहकार्य लाभले.अजित जाधव यांनी सुत्रसंचलन केले. श्री बापूराव सूळ उपाध्यक्ष सुजन फौंडेशन यांनी आभार मानले.