वडुज पुसेगाव रस्त्यावर भीषण अपघात पोलिसासह दोघांचा मृत्यू
वडुज : वडूज -पुसेगाव रस्त्यावर वाकेश्वर फाटा येथे रात्री 9 वाजता दोन दुचाकींची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलिसासह दोघे ठार झाले आहेत. हवालदार अजित टकले आणि महादेव वायदंडे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मंगलवारी रात्री 9 महादेव सुदाम वायदंडे वय (25)रा.खटाव, यशवंत साठे रा. अक्कलकोट व प्रतीक वायदंडे हे तिघे वडुज कडे दुचाकीवरून निघाले होते.
त्याचवेळी दहिवडी पोलीस ठाण्याचे हवालदार अजित टकले (रा. नीरा फलटण )हे वडूज वरून पुसेगाव ला जात होते. या दोन्ही दुचाकी वाकेश्वर फाटा येथे आल्या असता या गाड्यांची समोरासमोर धडक होऊन यामध्ये महादेव वायदंडे आणि हवालदार अजित टकले यांचा मृत्यू झाला. सर्व जखमींना साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Post a Comment