अश्विनी लोणकर तालुक्यात प्रथम


स्थैर्य, फलटण: येथील मुधोजी हायस्कुलमधील अश्विनी लोणकर हिने 99.80% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुधोजी हायस्कूल येथील जानव्ही मुळीक हिने 99.20% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातून 4833 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसले होते तर त्या पैकी 4336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या मध्ये 1044 विद्यार्थ्यांनी डिस्टिंगशन मिळवले असून प्रथम ग्रेड मध्ये 1413, द्वितीय ग्रेड मध्ये 1443 तर तृतीय ग्रेड मध्ये 436 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फलटण तालुक्याचा एकूण निकाल 89.71% लागला आहे.

No comments

Powered by Blogger.