Your Own Digital Platform

लोणंद सेंट अॅन्सचा दहावीचा निकाल १००%


लोणंद : लोणंद ता. खंडाळा येथील सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल, अॅन्ड ज्यूनियर कॉलेज,लोणंद ता. खंडाळा विद्यालयाचा निकाल १०० % टक्के लागला असुन विद्यालयाने दहावीच्या ऊज्जल निकालाची परंपरा कायम ठेवली असून  विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक दिग्वीजय पवार या विद्यार्थ्यांने ९६.६ % गुण मिळवून तर विद्यालयामध्ये व्दीतीय क्रमाक ९४.४ %  समान गुण मिळवून तिन विद्यार्थ्यांनी मिळविला आहे.

त्यामध्ये मुग्धा काकडे, आदीत्य कुठार,, शिवराजे काकडे तर तृतीय क्रमांक ९३.६ % समान गुण मिळवून आयुष दोषी, प्राची खामकर या दोन विद्यार्थांनी मिळविला आहे. सेंट अॅन्स इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये ऐंशी विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण, सोळा विद्यार्थी प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण, तर तीन विद्यार्थीं व्दीतीय श्रेणीत ऊत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सेंट अॅन्सच्या प्राचार्या सिप्टर विन्सी मारीया व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद यांनी केले.