Your Own Digital Platform

साताऱ्यात अपघातात दोन ठार


सातारा : साताऱ्यातील जरंडेश्वर नाका परिसरात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता एसटी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. एसटीखाली दुचाकी आल्याने गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये २ युवक ठार झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विजापूर ही एसटी साताराकडे येत होती. यावेळी दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकी एसटीच्या खाली गेल्याने त्यावरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

अपघातानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ठार झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.