जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कराडमध्ये सायकल रॅली


कराड : कराड (जि. सातारा) येथे मंगळवारी जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कराड नगरपालिका, कराड अर्बंन बँक, एनव्हायरो नेचर फ्रेंडस नेचर क्लब, कृष्णा हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल यांच्यासह विविध क्षेत्रातील संस्थांनी एकत्रित येत सायंकाळी पाचच्या सुमारास सायकल रॅली काढली. कराड अर्बंन बँकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, पर्यावरण प्रेमी चंद्रकांत जाधव यांच्यासह शेकडो कराडकर नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.प्रारंभी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती प्रियांका यादव, नगरसेवक वैभव हिंगमिरे, ज्ञानदेव राजापुरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या रॅलीस प्रारंभ झाला. कृष्णा हॉस्पिटलचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, कराड नगरपालिकेचे अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा या रॅलीतील सहभाग लक्षणीय असाच होता. सायंकाळी पाचच्या सुमारास या सायकल रॅलीस प्रारंभ होऊन कराडमधील कृष्णा नाका, मंगळवार पेठ, कन्याशाळा, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौक, बसस्थानक, विजय दिवस चौक ते शिवाजी हौसिंग सोसायटी असा या रॅलीचा मार्ग होता.

No comments

Powered by Blogger.