वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेचे उज्वल यश
मायणी : केंद्र शासन पुरस्कत इ.८वीच्या विद्यार्थांच्या घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला मायणीचे उत्तुंग यश.

या विद्यालयाच्या सहा विद्यार्थिनींची या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थीनींना इ.१२वी पर्यंत रु. एक हजार प्रतिमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थिनींना विद्यालयातील उपशिक्षक दादासाहेब कचरे यांनी मार्गदर्शन केले होते. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थीनी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, संस्थापक सचिव सुधाकर कुबेर,मुख्याध्यापिका सौ. वृषाली पाटील, सर्व संचालक, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

No comments

Powered by Blogger.