Your Own Digital Platform

कलेढोण येथील गीतामाई मंदिरातील भक्तनिवास भक्तांना लवकरच खुले होणार


मायणी : असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प.पूज्य श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या मातोश्री प.पूज्य गीतामाई यांचे मंदिरातील भक्तनिवासाचे काम पूर्ण झाले असून सदर भक्तनिवास थोडयाच दिवसांत भक्तांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती या मंदिराचे विश्वस्त श्रीकांत इनामदार यांनी दिली.

महाराष्ट्रासह कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे आजोळ खटाव तालुक्यातील कलेढोण आहे. त्यांचे वंशज इनामदार हे कलेढोण येथे आहेत. त्यांच्या व अनेक भक्तांच्या सहकार्यातून कलेढोण येथे श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या मातोश्री प.पूज्य गीतामाई यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. प्रतिवर्षी या मंदिरात प.पूज्य गीताई माता यांचा पुण्यतिथी सोहळा अनेकविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन संपन्न होत असतो. सदर चार- पाच दिवस चालणाऱ्या सोहळ्यासाठी असंख्य भक्तगण कलेढोण येथे येत असतात. मात्र बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांची येथे निवासाची सोय नसल्याने व स्वच्छतागृह नसाल्याने गैरसोय होत असे. 

ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन प.पूज्य गीतामाई यांचे वंशज इनामदार बंधू यांनी या ठिकाणी भक्तनिवासाचे व स्वच्छतागृहाचे बांधकाम करुन भक्तांच्या निवासाचे बांधकाम पूर्ण केले असून रंगरंगोटीसह सर्व काम पूर्ण झाले आहे. थोड्याच दिवसात सदर भक्तनिवास भक्तांना खुले करण्यात येणार आहे.