मातीमिश्रीत वाळुचे परवाने रद्द करण्याची नगराध्यक्ष तुषार विरकर यांची मागणी


म्हसवड :  म्हसवड नगरपरिषद हद्दीत मातीमिश्रीतच्या नावाखाली माणगंगा नदीपात्रातुन वाळुची मोठ्या प्रमाणात चोरी होत असुन हे परवाने रद्द करून सबंधित ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाव्दारे केली आहे .

तुषार विरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की म्हसवड नगरपरिषद हद्दीमध्ये मातीमिश्रीत वाळु उत्खननासाठी महसुल जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे , परंतु परवानगी देताना नगरपरिषदेला कोणतेही पुर्वसूचना व पत्रव्यवहार केला नाही .

म्हसवड नगरपरिषद हद्दीतील नदीत मातीमिश्रीतच्या नावाखाली नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणात उत्खनन चालु आहे , दररोज 200 ते 250 डंपर नदीपात्रातुन चोरी होत आहे ,या वाहनांमुळे नगरपरिषद हद्दीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे ,पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटून रोगराई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे ,ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ,तरी सदर मातीमिश्रीत प्रकरणांच्या नावाखाली चाललेली वाळु चोरीला आळा घालुन ही प्रकरणे त्वरीत बंद करण्यात यावी या प्रकरणी कोणताही दिरंगाई झाल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ उपजिल्हाधिकारी ( महसुल ) यांच्या निर्णयाविरोधात उपोषण करणार आहोत , तसेच या प्रकरणांची चौकशी करून सबंधित चोरून नेलेल्या वाळुचा पंचनामा करून सबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे .

No comments

Powered by Blogger.