Your Own Digital Platform

सुरेंद्र गुदगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान


मायणी : मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ,मायणी अर्बन बँकेचे चेअरमन, सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व जि. प. सदस्य सुरेंद्रदादा गुदगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ५५व्यक्तींनी रक्तदान करून सुरेंद्र दादा गुदगे यांचा वाढदिवस साजरा केला.
येथील श्रीनाथ मंदिरात सकाळी दहा वाजता रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिन सुधाकर कुबेर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला .सदर वेळी माजी सरपंच दादासो कचरे ,मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एन.व्ही. कुबेर व बाळासाहेब जाधव , वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण देशमुख,ग्रा .पं. सदस्य पापाभाई नदाफ, हेमंत जाधव ,अनिल माळी, मायणी अर्बन बँकेचे माजी संचालक अरुण सुरमुख, अरुण जाधव, तानाजी सोमदे, पांडुरंग देशमुख, सोसायटीचे माजी चेअरमन प्रतिनिधी, अनिल कचरे, स्वप्नील घाडगे, प्रसाद कुंभार, पवार सर, भारतमाता ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य प्रमोद इनामदार यशवंत विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव देशमुख, व्हा. चेअरमन सानप, सचिव धनाजी माळी, सुरेंद्रदादा गुदगे यूज क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते यावेळी मायणी ग्रामपंचायतीचे विरोधी पक्षनेते रणजित माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही नागरिकांमार्फत सत्कार करण्यात आला .रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी सुरेंद्र गुदगे व रणजीत माने यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू दिली .सदर शिबीरात डॉ. एम .मुजावर , प्राची वाईगणकर,नितीन कोकाटे, ई.एस. गजघाट यांनी रक्तदान शिबिरांचे व्यवस्थापन केले . संपूर्ण मायणी गावामध्ये सुरेंद्र गुदगे यांना हार्दिक शुभेच्छा देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

या वाढदिवसा निमित्ताने रात्री कोल्हापूरच्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .श्री वसंतदादा पाटील रक्तपेढी व रक्त विकार संशोधन केंद्र ,श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन आय हॉस्पिटल मिरज व सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल ब्लड बँक मिरज यांच्यावतीने सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.