पन्हाळा वाघबीळ घाटात ट्रॅव्हल्स पलटली ; १६ जण जखमी


सातारा : पन्हाळा येथून सातार्‍याला मलकापूर मार्गे जात असताना ट्रॅव्हल्‍सचा अपघात झाला. या अपघातात सुमारे 16 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या 1977 च्या दहावीची ही बॅच असून गेट टुगेदरसाठी ते रविवारी पन्हाळा येथे गेले असल्याचे समोर आले आहे.केतन महाजनी, प्रशांत कुलकर्णी, रविंद्र शेठ, राधिका तक, विनोद गोडबोले, मुकुंद मोघे, नलिनी पोवार, रिता चिटणीस, अनुश्री चिरमुले, शिवानंद देशपांडे, नितीन बुधकर, विवेक नेवाळकर, विजय कुलकर्णी, अंजली देशमुख, दिनेश पेंढारकर अशी अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, या ट्रॅव्हल्समधील हे सर्वजण सातार्‍यात 1977 साली दहावीला शिकण्यासाठी एकत्र होते. गेट टुगेदरसाठी ते सातार्‍यातून पन्हाळा येथे गेले होते. गेट टुगेदर झाल्यानंतर ट्रॅव्हल्समधून मलकापूर मार्गे सातारा येथे ते परत येत असताना अंबवडे ता.पन्हाळा वाघबीळ घाटात ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या दुर्घटेन ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. यावेळी उपस्‍थित नागरिकांनी सर्व जखमींना तत्काळ बाहेर काढून कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

No comments

Powered by Blogger.