मानवतेचे कल्याण हीच प्रत्येक धर्माची शिकवण : अनिल मोहिते


पाटण :इस्लाम धर्माची जी पाच मुलतत्वे आहेत त्यापैकी रमजान हा पवित्र महिना मानला जातो. ईमान,नमाज,रोजा,जकात व हज या आधारस्तंभावर इस्लाम संपूर्ण विश्वात मानवतावादी बीजे पेरत आलेला आहे.खर् या अर्थाने धार्मिक ,सामाजिक ,आध्यात्मिक व वैयक्तिक स्तरावर मानवाचा व संपूर्ण समाजाचा मानवतावादी दृष्टिकोनातून उद्धार करण्याचे काम इस्लाम रमजानच्या माध्यमातून करतो.मानवतेचे कल्याण हीच प्रत्येक धर्माची शिकवणुक आहे .असे प्रतिपादन आधार जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.

कोयनानगर येथे आधार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी मध्ये ते बोलत होते.

अनिल मोहिते पुढे म्हणाले की, रोजामध्ये अंदाजे १३ते१४तास शरीराला विश्रांती मिळाल्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांची कार्यक्षमता वाढते .रोजा संयम शिकवतो.तसेच काम,क्रोध ,लोभ,मोह,मद,मत्सर या षडरिपुपासुन मुक्ती मिळते .याशिवाय रोजाचा आणखी एक सामाजिक पैलु आहे तो म्हणजे आज जगामध्ये श्रीमंत फक्त ३%चआहेत .उर्वरित लोकसंख्येच्या ६०%लोकांना एक वेळचे अन्न देखील व्यवस्थित मिळत नाही .कुपोषण, दारिद्रय ,गरिबी ,भुकबळी अशा समस्या वाढताहेत.उपाशी पोटी काम करताना काय यातना होतात याची जाणीव रोजे करणाऱ्यांना होतो हा खुप मोठा सामाजिक पैलू आहे .

अकबर आतार यांनी स्वागत केले.सोमनाथ आग्रे यांनी प्रास्तविक केले.आभार इकबाल हकीम यांनी मानले.

कार्यक्रमास नंदकुमार शेडगे,वसंत कदम ,प्रसाद वळसंग,स्वप्निल नेवरेकर,शेखर धामणकर,सोमनाथ जंगम,उत्तम भिसे,राजेंद्र पवार,कौस्तुभ पवार ,ऋत्विक भोपळे, मौलाना मुहम्मद मुक्तार, अझर तांबोळी,अजीरभाई शेख,ईस्माइल बेबल,कमुभाई तांबोळी,रियाज आतार,झाकीर संदे आदी मुस्लीम बांधव मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.