Your Own Digital Platform

म्हसवड येथील पोळ पेट्रोल पंपावर ४ लाखाचा दरोडा


म्हसवड : म्हसवड सातारा रस्त्यावर असलेल्या हिंदुस्थान कंपनीच्या पोळ पेट्रोल पंपावर काल मध्यरात्री च्या २ वा. ३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी पंपावरील खोलीचे शटर उचकडून ३ लाख ३८ हजार रुपयाची रोकड व ४० हजार रुपयांची चिल्लर अशी ३ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी शटर च्या आतील कपाटातुन चोरुन नेल्याची घटना घडली असुन यामुळे मात्र म्हसवड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 
याबाबतची अधिक माहीती अशी, काल रात्री दोन ते तीन वाजता या परिसरात रीमझीम पाऊस पडत होता. रात्रभर शहरात पाऊसाची रिमझिम सुरु असल्याने व विज सतत ये जा करीत असल्याने पंपावर शुकशुकाट होता. 

त्यामुळे पंपाचा रखवालदार बाहेर न थांबता केबीन मध्ये झोपला, या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी पंपाची कंपाऊंड ची तार कटरने कट करुन आत प्रवेश केला. व केबीन मधील कँश रुमचे शटरचा कोयंडा कट केला. व आत प्रवेश केला. आतील टेबलच्या ड्रावर मधील ३ लाख ३८ हजार रूपयाची रोकड लांबवली.
याबात म्हसवड पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास एपीआय देशमुख करीत आहेत.


चोरी नंतर सातारा येथील श्वान पथक मागविण्यात आले. मात्र कोणतीही वस्तु चोरट्याची पडली नसल्याने श्वान पथक परिसरात फिरत राहिले या पथकात एपीआय सौ. खटावकर.हवालदार सोनवणे, सोनवणे होते.

सिसिटीव्ही बंद मुळे तपास कार्यात अडथळा 

विशेष म्हणजे गेल्या महिन्या पासून सदर पेट्रोल पंपावर असलेले सीसीसी. टि. व्ही. कँमेरे हे बंद आहेत त्यामुळे सदर दरोड्याचा तपास करण्यास पोलीसांना अडथळे निर्माण झाले आहेत.

रोकड घरी न्यायची राहिल्याने मोठ्या रकमेचा आकडा 

सदर पेट्रोल पंपावर दररोज लाखो रुपये जमा होतात ती जमा होणारी रोख रक्कम दररोज पंप चालकाच्या घरी नेहली जाते दि. ६ रोजी मात्र काही कारणास्तव ही रक्कम घरी न नेहल्याने ती पंपावरील केबीनच्या कपाटात ठेवण्यात आली होती त्यामुळे सदर रक्कम चोरट्यांच्या हाती लागली असावी

३ महिण्यात जबरी दरोडा 

गत ३ महिण्यांपुर्वीही शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या घरावर अशाच प्रकारचा चोरच्यांनी डल्ला मारीत ३ लाखाहुन अधिक रकमेसह सोन्या चांदीचे लाखो रुपये किमतीचे दागीने चोरुन चोरच्यांनी पोबारा केला होता या प्रकरणाचा अद्यापही पोलीसांकडुन तपास लागला नसल्याने नागरीकांतुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रोज होणारी रात्रगस्त बंद 

शहरातुन रोज रात्री होणारी पोलीसांची रात्र गस्त गत काही महिन्यांपासुन बंद असल्यानेच शहर व परिसरात अशा चोर्यांचे प्रमाण वाढले असुन याकडे जिल्हा पोलीस अधिक्षक लक्ष देणार का? असा प्रश्न म्हसवडकर जनतेतुन विचारला जात आहे.

श्वान घुटमळल्याने तपास घुटमळार का?

सदर दरोड्याचा तपास तात्काळ लागावा चोरट्यांचा धागादोरा हाती यावा यासाठी पोलीसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले मात्र या पथकातील श्वान घटनास्थळी घुटमळत राहिल्याने सदर चोरीचा तपास असाच घुटमळणार का? असा प्रश्न म्हसवडकर जनतेतुन विचारला जात आहे.