Your Own Digital Platform

कराड : शेतकऱ्यांकडून सरकारचे प्रथम वर्षश्राद्ध


कराड : महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, त्याला आज एक वर्ष पुर्ण झाले आहे. तरीही कर्जमाफीसह राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने सरकारने पुर्ण केलेली नाहीत. त्यामुळे सरकारचा निषेध नोंदवत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचे शेतकऱ्यांनी कराडमध्ये (जि. सातारा) प्रथम वर्षश्राद्ध घातले.

बळीराजा शेतकरी संघटनेकडुन निषेध नोंदवण्यात येऊन हे आंदोलन करण्यात आले. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या कृष्णा कोयना प्रितिसंगमावरील घाटावर विधीवत वर्षश्राध्दाचे पिंडदान पुजा करुन नदीत सोडण्यात आले. यावेळी महिला मुलांसह शेतकरी हजर होते.

शेतकऱ्यांना सरकार जगु देत नाही. त्यांना शेतकऱ्यांची कणव येत नाही. शेती मालाला कमी भाव, दुधाचे कमी दर देणारे सरकार झोपले असले तर आम्ही त्यांना उठविण्यास सक्षम असुन सरकारला धडा शिकवू, अशी आक्रमक प्रतिक्रिया शेतकऱ्यांना व्यक्त केली.