उदयनराजे, विकासावर बोला; रामराजेंवर नको: विश्‍वजीतराजेस्थैर्य, फलटण: खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विकासाच्या मुद्द्यावर आरोप करावेत. ना. श्रीमंत रामराजे यांनी विकासाचे राजकारण नेहमीच केले आहे. त्यांच्यावर वैयक्तिक टीका करुन शिंतोडे उडवू नका, अशी प्रतिक्रीया पंचायत समिती सदस्य विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

काल फलटणला खासदार श्रीमंत उदयनराजे यांनी येवून ना. श्रीमंत रामराजेंवर केलेल्या टीकेविषयी प्रतिक्रीया देताना श्रीमंत विश्‍वजीतराजे बोलत होते.

श्रीमंत विश्‍वजीतराजे म्हणाले, शाळेत असल्यापासून आपले व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे संबंध आहेत. शाळेत त्यांच्याविषयी कोणी बोलले तर त्याला मारायलाही आपण कमी पडत नव्हतो. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचा आपण खुप मोठा फॅन होतो. मात्र, काल फलटणला येवून माझ्याच काकांवर म्हणजे ना. श्रीमंत रामराजेंवर केलेल्या टीकेमुळे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंविषयी तिरस्काराची भावना मनात तयार होते आहे. ना. श्रीमंत रामराजे यांनी विकासाचे राजकारण केले आहे. खंडाळा, फलटण तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम असो किंवा फलटणच्या दुष्काळी भाागाला पाणी पोहोचवण्याचे काम असो, ना. श्रीमंत रामराजे यांनी काम केले आहे. आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा बोलायला नसल्याने वैयक्तिक आरोप करीत आहेत.

आगामी काळात ना. श्रीमंत रामराजेंविषयी कोणीही ब्र शब्द काढल्यास त्यास आमच्या शैलीत उत्तर देवू. आरेला कारे करायला आम्ही धजत नाही. कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायची धमक आमच्यात आहे, असेही श्रीमंत विश्‍वजीतराजेंनी स्पष्ट केले. 

No comments

Powered by Blogger.